
दीपक भोसले/संगमेश्वर/दि ३० जून- रामपेठ (संगमेश्वर) येथील मराठी शाळेजवळ उभा असलेला साधारण तीनशे वर्षांपूर्वीचा पिंपळवृक्ष पावसाळी वाऱ्यामुळे कोसळून मोठे नुकसान घडवून गेला. ही दुर्घटना रात्री अंदाजे चार ते साडेचारच्या सुमारास घडली.
या घटनेत श्री. उदय संसारे, संजय संसारे व मिलिंद संसारे यांच्या घराच्या मागच्या बाजूस हा प्राचीन पिंपळवृक्ष कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केवळ घरच नव्हे, तर परिसरातील पोपळी, नारळ, पोपळझाडे आणि इतर फळझाडेही वृक्षाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली आहेत. या झाडांपासून संबंधित कुटुंबीयांना आर्थिक उत्पन्न मिळत होते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
या घटनेची माहिती संसारे कुटुंबीयांनी तात्काळ संबंधित शासकीय यंत्रणेला दिली असून, पंचनाम्याची व मदतीची मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने त्वरीत याकडे लक्ष देत योग्य ती मदत द्यावी, अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे.