
अकोला | विनयभंग, बलात्कार, घरगुती अत्याचार तसेच, महिलांवरील इतर अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र काहीवेळा प्रसंगावधान दाखवत मुली आपल्या समोर आलेल्या समस्येचा दणकून सामना करतात आणि समाजातील इतर महिलांसाठी उदाहरण बनतात.
असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याबाबत माहिती अशी की, सायंकाळच्या सुमारास घरात मुलगी एकटीच होती. हे समजताच आरोपी रितेश पद्माकर मोहोड (वय २४) याने घरात शिरून मुलीचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. मात्र त्याने मुलीचा हात पकडताच तिने आरोपीचा कडाडून चावा घेतला आणि त्यामुळे होणार अनर्थ टळला.
याबाबत कठोर पाऊल उचलत, अकोला पोलिसांनी गुन्हा दाखल करत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. तसेच न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून पुढील तीन वर्षे कारावास, तर तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.