मंत्री दीपक केसरकर यांना धमकी,मलबार हिल पोलिसाकंडून आरोपी प्रदीप भालेकरला अटक

Spread the love


मुंबई : मंत्री दीपक केसरकर यांना धमकी आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिसाकंडून आरोपी प्रदीप भालेकरला अटक करण्यात आली आहे. आरोपीने खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.काही दिवसांपूर्वी प्रदीप भालेकर यांने मंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयातील एका व्यक्तिला ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी पोलिंसानी आरोपीला अटक केली आहे. दिपक केसरकर यांच्या कार्यलयातील व्यक्तिने तक्रार दाखल केली आहे.
यापूर्वी देखील दिपक केसरकर यांनी या व्यक्तिला काही मदत केली होती. मात्र मदत थांबवली तेव्हा काही माहिती उघड करतो सांगून तो धमकीचे फोन करत होता, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page