संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देणारा ताब्यात

Spread the love

मुंबई l 01 एप्रिल – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने शोधून काढत ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी त्याला मुंबई पोलिसांच्या हवाली केले आहे. आता याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

संजय राऊत यांना शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याचा मॅसेज करण्यात आला. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांचीही हत्या करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली होती. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी राहुल तळेकर या २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले आहे. हा तरुण एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्याने संजय राऊतांना असा मॅसेज का केला? त्याला असे करण्यास कोणी सांगितले का? याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page