
रत्नागिरी:- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा होणार आहे. गणपतीपुळे येथील देवस्थान समितीच्या वतीने या यात्रोत्सवाचे अतिशय चोख नियोजन करण्यात आले असून अंगारकीच्या पार्श्वभूमीवर स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता पहाटे साडेतीन वाजता खुले होणार असून प्रारंभी गणपती मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या असते पूजाअर्चा,मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी मंदिर आणि देवबाग परिसरात देवस्थान समितीकडून अतिशय योग्य प्रकारच्या दर्शन रांगा उभारण्यात आल्या आहेत. या दर्शन रांगांमधून हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवीन वर्षातील पहिल्या अंगारकीचा योग जुळून आल्याने स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी घाटमाथ्यावरील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, इचलकरंजी, मिरज, कराड, इस्लामपूर , कवठेमहाकाळ आदी ठिकाणाहून हजारो संख्येने भाविक दाखल होणार असून यंदाच्या 2026 च्या नववर्षातील हा पहिला अंगारकीचा योग जुळून आल्याने नववर्षातील नवनवे संकल्प आणि आपल्या इच्छा आकांशा पूर्णत्वास जाण्यासाठी श्रींच्या समोर प्रार्थना करण्यासाठी घाटमाथ्यासह विविध ठिकाणच्या भाविकांच्या गर्दीचा मोठा जनसागर उसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर जयगड पोलिस ठाण्याकडून कडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असून संपूर्ण मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून ज्यादा पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार असल्याचे जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मंदिर आणि विशेषत: समुद्र चौपाटीवर कुठलीही दुर्घटना घडणार नाही या दृष्टीने विशेष गस्त घालण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली असून पर्यटक भाविकांना समुद्राच्या धोक्याविषयी माहिती देण्याबाबत खास ध्वनी ध्वनिशेपकावरून समुद्राच्या धोक्याविषयी व भाविकांनी स्वतःच्या सुरक्षिततेविषयी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती संकलित असलेली कॅसेट वारंवार ऐकवली जाणार आहे. एकूणच ,गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात अंगारकीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून अंगारकीचे चोख नियोजन करण्यात आल्याचे सर्व यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.तसेच अंगारकीच्या पार्श्वभूमीवर घाटमाथ्यावरील भाविकांबरोबरच अनेक दुकानदार यात्रेसाठी आणि गणेश मंडळे महाप्रसादाचे वाटप करण्यासाठी दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे . त्यामुळे भाविकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी साडेचार वाजता देवस्थान समितीकडून स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत आणि मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात काढण्यात येणार आहे तसेच अंगारकीच्या पार्श्वभूमीवर पहाटे साडेतीन वाजता पहाटे साडेतीन वाजल्यापासून रात्री साडेदहापर्यंत भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले आहे .
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*