नोकरी करणाऱ्यांसाठी आणि विवाहित जोडप्यांसाठी ‘हा’ आठवडा ठरेल खास; वाचा साप्ताहिक राशीभविष्य…

Spread the love

दैनंदिन राशीभविष्यावरून रोजच्या घडामोडींचा अंदाज येतो. तर मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल हा आठवडा? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्यात.




मेष (Aries) : हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. त्यांच्या नात्यात गैरसमजामुळं तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जर त्यांच्या नात्यातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्यात ते नक्कीच यशस्वी होऊन आपले नाते दृढ करू शकतील. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. आपण एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तसेच आपण पूर्वी जी काही गुंतवणूक केली होती त्यातून आपणास चांगला लाभ सुद्धा होईल. आपण आपल्या बचतीवर लक्ष द्याल. व्यापारास आठवडा सामान्य फलदायी आहे. या आठवड्यात आपणास आपली कामे पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या समस्या दूर करण्यासाठी वरिष्ठांशी बोलणी करतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा आनंद घेऊन येईल. जे एखाद्या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यांना चांगले परिणाम मिळण्याची संभावना आहे. असं असलं तरी त्यांनी आपला वेळ वाया दवडू नये. या आठवड्यात आरोग्य विषयक काही समस्या उदभवू शकतात. उच्च रक्तदाब सारखी समस्या उदभवल्याने आपणास आर्थिक समस्येला सुद्धा तोंड द्यावे लागेल.

वृषभ (Taurus) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. विवाहितांच्या समस्या वाढतील. प्रेमात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं अडचणीत येऊ शकतात. तेव्हा सावध राहावं. तसेच या आठवड्यात खर्चात वाढ होईल. आपण जर घर, दुकान इत्यादी खरेदी करणार असाल तर त्यात जास्त पैसा खर्च झाल्यानं आपली आर्थिक स्थिती खालावू शकते. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळून मनासारखा फायदा होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना या आठवड्यात चांगली नोकरी मिळण्याची संभावना आहे. असं असलं तरी आपण जर सध्याची नोकरी चालू ठेवलीत तर ते आपणास हिताच राहिल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य परिणाम न मिळाल्यानं ते निराश होतील. असं असलं तरी मेहनत करणं सोडू नका. ते एखाद्या संशोधनात स्वारस्य दाखवू शकतात. या आठवड्यात आपल्या आरोग्य विषयक समस्येत वाढ होईल. रक्तदाब किंवा मधुमेह इत्यादी सारख्या समस्या होऊ शकतात. तेव्हा आपल्या प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल.

मिथुन (Gemini) : हा आठवडा आपल्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. विवाहितांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात परस्पर सामंजस्याचा अभाव असल्यानं त्यांचं वैवाहिक जीवन तणावग्रस्त राहील. जोडीदाराशी चर्चा करून हा तणाव दूर करण्याचा आपणास प्रयत्न करावा लागेल. प्रेमीजनांना एखाद्या आर्थिक समस्येमुळं नात्यात काही त्रास जाणवेल. आर्थिक बाबतीत आठवडा मिश्र फलदायी आहे. आपणास प्राप्तीच्या स्रोतांवर लक्ष द्यावं लागेल, जेणेकरून आपण प्राप्तीत वाढ करू शकाल. आपला जो पैसा बुडाला होता तो सुद्धा या आठवड्यात मिळण्याची संभावना आहे. असं झाल्यास आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. व्यापारी आपल्या जुन्या प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक करतील, जे त्यांच्या हिताचं होऊन व्यापार सुद्धा वाढू शकेल. या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. आपली पगारवाढ झाल्यानं आपण प्रसन्न व्हाल. कारकिर्दीत सुद्धा आपणास एखादी संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी आपला वेळ वाया दवडू नये. अन्यथा आपणास पश्चाताप होईल. तेव्हा त्यांनी आपल्या अध्ययनावर लक्ष केंद्रित करावं. आपणास रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या होण्याची संभावना आहे. त्यामुळं आपणास चालताना त्रास होऊ शकतो. त्यातून सुटका होण्यासाठी आपणास व्यायामाची व फिझिओथेरपीची मदत घ्यावी लागेल.

कर्क (Cancer) : या आठवड्यात प्रेमात दुर्लक्ष झाल्यानं त्यांची प्रेमिका नाराज होईल आणि त्यामुळं नात्यातील कटुता वाढेल. हि कटुता दूर करण्यासाठी प्रेमिकेस एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास घेऊन जाणं हिताच राहिल. वैवाहिक जीवनातील नाते पूर्वी सारखेच राहील. काही समस्या दोघांनी चर्चा करून सोडवाव्या लागतील. हा आठवडा आर्थिक बाबतीत चांगला आहे. दीर्घ काळापासून आपण जर एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असलात तर या आठवड्यात ती खरेदी करू शकता. आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते आपल्या व्यवसायास परदेशात विस्तारित करण्यात यशस्वी होतील. यासाठी त्यांच्या मित्रांची मदत होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांची बदली झाल्यामुळं त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागू शकतं. विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल. ते मित्रांच्या सहवासात आणि सामाजिक माध्यमात आपला बहुतांश वेळ वाया घालवतील. तेव्हा चांगले परिणाम मिळविण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल. या आठवड्यात आपणास प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. आपल्या कामावर आणि प्रकृतीवर आपणास विशेष लक्ष द्यावं लागेल. आपणास जर अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल तर आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

सिंह (Leo) : हा आठवडा आपल्यासाठी आनंददायी होणार आहे. कारण विवाहेच्छुकांना मनाजोगा जोडीदार मिळेल. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस आवश्यक तितका वेळ देऊ शकतील. ते प्रेमात बुडालेले दिसतील. वैवाहिक जीवनातील समस्या सुद्धा दूर होतील. आपला आनंद द्विगुणित होईल. व्यापारात आपणास चांगला लाभ होईल. आपण जर व्यवसायात एखादा भागीदार घेतलात तर व्यवसायास भरभराटी येईल. आपण जर कर्जासाठी अर्ज केला असेल तर तो सहजगत्या मंजूर होईल. व्यवसायात एखादी नवीन योजना सुरु करणं हिताच ठरेल. आपला व्यवसाय वृद्धिंगत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतील. वरिष्ठ त्यांच्या कामगिरीने प्रसन्न होतील. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अध्ययनाकडं दुर्लक्ष करू नये. आपणास जर एखाद्या परीक्षेस बसावयाचं असेल तर चांगले परिणाम मिळविण्यासाठी आपणास अभ्यासास भरपूर वेळ काढावा लागेल. प्रकृतीच्या दृष्टीनं आठवडा चांगला आहे. जर एखादे दुखणं आपणास त्रास देत असेल तर होणारा त्रास कमी होण्याची संभावना आहे. मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी थोडी काळजी घ्यावी. त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल.

कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासह एखाद्या दूरवरच्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात. आपण जर एखादी जमीन खरेदी करण्याची योजना आखली असेल तर ती या आठवड्यात पूर्णत्वास जाण्याची संभावना आहे. असं असलं तरी या आठवड्यात खर्चात वाढ होणार असल्यानं आपणास त्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. एखाद्या योजनेत आपण जास्तीची आर्थिक गुंतवणूक करू शकता. एखाया कामासाठी आपण कर्ज सुद्धा घेऊ शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्ती या आठवड्यात नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात, जी त्यांच्यासाठी योग्य असेल. व्यापाऱ्यांना कामानिमित्त भरपूर प्रवास करावे लागतील. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी जागरूक राहावं लागेल. त्यांना मेहनत वाढवावी लागेल. त्यांना मेहनतीचं अपेक्षित फळ मिळणार नाही. आरोग्यास हा आठवडा मिश्र फलदायी आहे. आपल्या काही जुन्या समस्या दूर होताना दिसत आहे. या आठवड्यात आपणास प्रकृती विषयक लहान – सहान समस्यांकडं दुर्लक्ष करून चालणार नाही.

तूळ (Libra) : हा आठवडा आपल्यासाठी गोंधळाने भरलेला आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा मिश्र फलदायी आहे. या आठवड्यात आपण आपले प्रणयी नाते दृढ करण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी प्रेमिकेस आवश्यक तितका वेळ आपण द्याल. प्रणयी जीवनात गोंधळ असल्यानं काही समस्या निर्माण होतील, परंतु चर्चा करून त्यांचं निराकरण करण्यात आपण यशस्वी व्हाल. आर्थिकदृष्ट्या आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. काही महागड्या वस्तूंची खरेदी करण्यात आणि आपली हौस भागविण्यात जास्त पैसा खर्च केल्यानं आपल्या आर्थिक परिस्थितीवर ताण येऊ शकतो. शेअर्स बाजाराशी संबंधित व्यक्तींनी एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार आर्थिक गुंतवणूक करावी. व्यापाऱ्यांना नवीन आर्थिक गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. ते आपल्या बुद्धीने व्यवसायात प्रगती करू शकतील. या आठवड्यात आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी आत्मविश्वास उंचावण्याची गरज भासेल. ह्या आठवड्यात एखाद्या शासकीय नोकरीसाठी परीक्षेस बसण्याची संधी मिळेल. प्रकृतीच्यादृष्टीनं आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपणास आपल्या दिनचर्येवर लक्ष ठेवावं लागेल.

वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा प्रेमीजनांसाठी समस्या घेऊन येत आहे. आपली जुनी प्रेमिका परत येऊन आपल्या समोर समस्या निर्माण करेल. आपण मात्र तिच्यापासून लांब राहावे. वैवाहिक जीवनात जर एखादी समस्या दीर्घ काळापासून असली तर त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. असं केल्यानेच आपलं नातं दृढ होऊ शकेल. एखाद्या कामात समस्यांना सामोरे जावे लागेल. या आठवड्यात कोणत्याही योजनेत जास्त पैसा गुंतवू नका. हा आठवड्यात शेअर्स बाजार प्रतिकूल असेल. आपणास एखाद्या प्रॉपर्टीचा सौदा पूर्ण करण्याची संधी मिळेल. खर्चात वाढ झाल्यानं आपण काहीसे त्रस्त व्हाल. नोकरी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. त्यांच्या कामगिरीवर वरिष्ठ प्रसन्न होतील. व्यापारासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांनी जर मित्रांच्या सहवासात जास्त वेळ घालविला असेल तर परीक्षेच्या परिणामांवर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. त्यांना अपेक्षित परिणाम मिळण्यात अडचण येईल. त्यांचं मन विचलित होईल. एकंदरीत हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण दुर्लक्ष केल्याने काही समस्या निर्माण होतील, तेव्हा कोठे फिरावयास गेलात तर आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावं.

धनु (Sagittarius) : हा आठवडा आपल्यासाठी काहीसा तणावग्रस्त आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा गोधळाचा आहे. त्यांची जुनी प्रेमिका परत फिरण्याची शक्यता असून त्यांच्या नात्यात समस्या वाढून गोधळ निर्माण होईल. नात्यातील हा तणावास आपल्यालाच सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवनातील समस्यांचं निराकरण आपणास करावं लागेल. एकमेकांचे दोष स्वीकारून आपणास वाटचाल करावी लागेल. या आठवड्यात आपण पैशाच्या बाबतीत त्रस्त असाल. हाती पैसा कमी असल्याने आपणास बँकेतून सुद्धा काही पैसे काढावे लागू शकतात. आपण एखाद्या सरकारी योजनेवर लक्ष द्याल. शेअर्स बाजाराशी संबंधित व्यक्ती पूर्वी घेतलेल्या शेअर्समुळं चांगला पैसा कमावू शकतील. व्यवसायात समस्या वाढविणारा आठवडा असला तरी आपली प्राप्ती वाढविण्यावर आपण लक्ष केंद्रित करावे. हा आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगला लाभदायक आहे. आपण जर एखादे काम भागीदारीत केले असेल तर ते आपल्यासाठी उत्तम असेल. नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयात एखाद्याशी भांडण केले तर त्याचा प्रभाव नोकरीवर होऊन कदाचित त्यांना नोकरी सुद्धा गमवावी लागू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मिश्र फलदायी आहे. नोकरीच्या तयारीत असलेल्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीनं काहीसा प्रतिकूल आहे. काही जुने विकार आपणास त्रस्त करतील. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपणास दिनचर्येत ध्यान – धारणेस समाविष्ट करावे लागेल.

मकर (Capricorn) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. या आठवड्यात आपण कामात इतके व्यस्त राहाल कि आपल्या प्रेमिकेस अत्यंत थोडा वेळ देऊ शकाल. कौटुंबिक समस्यांमुळं विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु त्या दूर करण्यात आपण यशस्वी व्हाल. आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला आहे. काही आर्थिक अडचणी आल्या तरी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून रग्गड पैसा मिळाल्याने हे अडथळे सहजपणे दूर होतील. हा आठवड्यात आपण घरासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा अरु शकता. कोणाशीही उसनवारी करू नये. व्यापाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. कोणत्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करावी व कोणत्यात करू नये हे न समजल्याने आपला गोंधळ उडेल. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात सतर्क राहावं लागेल. आपले काही सहकारी आपल्या विरुद्ध एखादे नवीन षडयंत्र रचू शकतात. विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान वाढविण्यावर भर द्यावा. त्यांच्या अभ्यासात येत असलेल्या समस्या एखाद्या अनुभवी व्यक्तीशी चर्चा करून दूर होऊ शकतील. ह्या आठवड्यात आपणास प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. आपणास गुढघे दुखीचा त्रास होण्याची संभावना आहे.

कुंभ(Aquarius) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा मिश्र फलदायी आहे. आपण आपल्या नात्यास वेळ देऊ शकाल. दोघांनाही एकमेकांच्या सहवासात वेळ घालवून आनंद होईल. वैवाहिक जीवनात आपणास संयमित राहण्याची गरज आहे. आपले वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदारास समजून घेण्याचा प्रयत्न करावा. हा आठवडा आर्थिक बाबतीत अनुकूल आहे. आपणास ज्याची खरेदी करावयाची असेल ती या आठवड्यात करू शकता. एखाद्या प्रॉपर्टीतून आपणास पैसा मिळण्याची संभावना आहे. व्यापारी योजनांवर आपण भरपूर खर्च कराल. या आठवड्यात प्रॉपर्टी इत्यादीत गुंतवणूक करणं आपल्यासाठी हिताच राहिल. या आठवड्यात व्यापारी चांगला पैसा कमवू शकतील. आपल्या कामाव्यतिरिक्त एखाद्याशी भागीदारी करून नवीन कामास सुरूवात सुद्धा ते करू शकतील. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नतीमुळं धावपळ वाढेल. या आठवड्यात आरोग्य विषयक काही समस्या उदभवतील. आपला एखादा जुनाट विकार पुन्हा उफाळून येईल. तेव्हा प्रकृतीकडं दुर्लक्ष न करता शारीरिक तपासणी करून घ्यावी.

मीन (Pisces) : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आनंद घेऊन येणारा आहे. आपले नाते पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून एखादी आनंदवार्ता ऐकण्यास मिळू शकते. त्याने आपल्या जीवनात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. या आठवड्यात खर्चातील वाढ हि आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. आपले खर्च आपल्यासाठी समस्येच्या स्वरूपात येतील. आपला व्यापार विस्तारित करण्यासाठी आपण नवनवीन लोकांशी ओळख कराल. त्याचा लाभ आपल्या व्यवसायास नक्कीच होईल. आपला व्यवसाय पूर्वीपेक्षा वाढेल. आपली खूप प्रगती होईल. नोकरीत बदल करणे आपणास हिताच राहिल. तेव्हा आपण दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करू शकता. विद्यार्थी त्यांच्या काही व्यक्तिगत समस्येंमुळं त्रस्त होतील. त्यामुळं त्यांच्या अध्ययनात अडथळा निर्माण होईल. असं असलं तरी त्यांना आपल्या अभ्यासाप्रती सतर्क राहावं लागेल. आरोग्य विषयक तक्रारी या आठवड्यात दूर होऊ शकतील, मात्र रागात वाहन चालविल्याने समस्या निर्माण होऊ शकते. आपणास एखादी दुखापत होण्याची संभावना सुद्धा आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page