सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर अडकणार लग्नबंधनात; ‘या’ क्रिकेटरने केला खुलासा…

Spread the love

सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आाता पुन्हा एकदा सारा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.

सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर अडकणार लग्नबंधनात; ‘या’ क्रिकेटरने केला खुलासा.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शुभमन गिल सध्या त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून शुभमनचे नाव क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जात आहे. दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र लपून-छपून केलेलं प्रेम जास्त दिवस लपून राहत नाही, असंच काहीसं शुभमन आणि सारासोबतही घडू लागलं आहे.

सारा अली खाननंतर त्याने खुलासा केला.

कालांतराने दोघांच्या नात्याबद्दल उघडपणं बोललं जाऊ लागलं आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण 8’मध्ये शुभमनसोबतच्या नात्याची पुष्टी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांचं नातं पक्कं झालं आहे. वास्तविक UAE चा क्रिकेटर चिराग सूरीने शुभमन आणि सारा यांच्या नात्याला पुष्टी देणारं एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page