
पोटात जाताच चरबी मेणासारखी जाळून टाकतात ही 8 फळं, जिम व डाएट न करता पोटाची ढेरी होते छुमंतर
लठ्ठपणाची समस्या म्हणजे अनेक गंभीर आजारांना थेट आमंत्रण होय. असे म्हणतात की ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना Diabetes, Cancer, Thyroid आणि इतर अनेक गंभीर रोगांचा धोका जास्त असतो. वजन कमी करण्यासाठी लोक विविध डाएट प्लान फॉलो करतात आणि जिममध्ये तासनतास घाम गाळतात. जर तुम्हाला जास्त कष्ट न घेता पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुमच्या आहारात तुम्ही जास्तीत जास्त फळांचा समावेश केला पाहिजे. बर्याच फळांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर भरपूर असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.
सफरचंद, बेरी आणि कलिंगड यांसारखी फळे पोट भरण्याचे काम करतात. फळे म्हणजे नैसर्गिकरित्या तयार होणारे स्नॅक्स आहेत जे Vitamins, Fibers आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असतात. दररोज फळे खाल्ल्याने शरीराचे वजन तर कमी होतेच, शिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोकाही कमी होतो. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कोणती फळं खावीत.

सफरचंदांमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. एका मोठ्या सफरचंदात 5.4 ग्रॅम फायबर असते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक सफरचंद खातात त्यांचे 4 वर्षांच्या कालावधीत दररोज सरासरी 1.24 पौंड (0.56 किलो) वजन कमी झाले होते.