मुंबईत सत्तापालट होणार!:भाजप-शिवसेना सत्तेत येण्याची चिन्हे, एक्झिट पोलमध्ये भाजपला 130-150 जागा; ठाकरे बंधूंना धक्का….

Spread the love

मुंबई- जनमतच्या एक्जिट पोलनुसार मुंबईत सत्तापालट होणार असल्याचे म्हटले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच शिवसेन ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गटाला 62 जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच कॉंग्रेस-वंचितला 20 तर इतरला 7 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेवर सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष होते. याच महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उपस्थित करत मराठी माणसाला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ठाकरे बांधूंच्या सभांना लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. परंतु, एक्जिट पोल वेगळे आकडे दाखवत असल्याचे दिसून येत आहे.

रुद्र रिसर्चनुसार, मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 121 जागा मिळतील. तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीला 71 जागा मिळतील. कॉंग्रेस आणि वंचितच्या आघाडीला मुंबईत 25 जागा मिळतील, तर इतरांना 10 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व…

सामच्या एक्झिट पोलनुसार वसई विरारमध्ये भाजपला 27, शिवसेना शिंदे गटाला 5, कॉंग्रेसला 3, शिवसेना ठाकरे गटाला 7, वंचितला 72 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप 42 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. मनसे 6 जागांवर, काँग्रेस 2 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 2 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर, वंचित बहुजन आघाडी 2 जागांवर आणि इतर 6 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.

उल्हासनगरमधला अंदाज काय?…

उल्हासनगरमध्ये भाजपाला 28, शिवसेना शिंदे गटाला 29 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळू शकतात. तसेच इतरांच्या स्थानिक जागा आहेत त्यांना 12, काँग्रेसला 2, शिवसेना ठाकरे गटाला 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 15, तर मनसेला 2 जागा मिळण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे.

पिंपरीत भाजपची सत्ता?…

पिंपरीचा देखील एक्जिट पोल समोर आला असून इथे देखील भाजपला जास्त मते मिळत असल्याचा अंदार ‘प्राब’ने वर्तवला आहे. प्राबने दिलेल्या आकडेवारीनुसार पिंपरीमध्ये भाजपला 24, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 51, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शरद पवार गटाला 2, शिवसेना ठाकरे गटाला शून्य, मनसेला एक तर वंचितला शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पुण्यात भाजपल 93 जागा मिळण्याचा अंदाज…

‘प्राब’नुसार पुण्यात भाजपला 93, शिवसेना शिंदे गटाला 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 43 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाला 7, शरद पवार गटाला 8, कॉंग्रेसला 8 आणि मनसेला शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज प्राबने वर्तवला आहे.

कोल्हापूरचा एक्झिट पोल…

जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार, कोल्हापुरात भाजपला 29-32, शिवसेना शिंदे गटाला 18-21, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 9-11 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसला 19-23, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0-1, शिवसेना ठाकरे गटाला 3-4, मनसेला 0-1, तर इतरांना 2-4 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page