कर्जत ,ता. ८ सुमित सुनिल क्षीरसागर
डिसेंबर महिन्यात माथेरानच्या दस्तुरी नाका येथे मुंबई येथून आलेल्या पर्यटाकांच वाहनाणे अचानक पेट घेतला होता.तर आज त्याची पुनरावृती माथेरान नेरळ घाटात झाली असून खासगी कार चा बर्निंग थरार घाटात पाहायला मिळाला. दरम्यान जळालेली कार १०० टक्के नष्ट झाली असून नेरळ पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षभरातील माथेरान नेरळ घाटातील ती तिसरी घटना आहे.
आज ८ एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास माथेरान घाटात पर्यटनासाठी आलेली पर्यटाकांची गाडीने पेट घेतला. घाटरस्ता असल्याने कार मधील वातानुकुलीत यंत्रणा बंद करायची असते,मात्र संबंधित कार चालकाने त्याबाबत दक्षता घेतली नाही आणि त्यामुळे घाटात ही चढावावर असताना गाडीच्या बॉनेट मधून धूर यायला लागला आणि त्यामुळे त्यावेळी प्रसंगावधान राखून सर्व प्रवासी पर्यटक यांनी गाडी मधून खाली येत आपले जीव वाचवले.या घटनेची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात घेणयात आली आहे.या अपघातात पर्यटकांच्या खासजि गाडीचे १०० टक्के नुकसान झाले असून माथेरान घातली या वर्षातील ती तिसरी घटना असून यापूर्वी जुम्मा पट्टी परिसरात आणि दस्तुरी येथे अशा घटना घडल्या होत्या.
राजेंद्र तेंडुलकर – पोलीस निरीक्षक
सध्या उन्हळ्याचे दिवस असून माथेरान साठी येणारी पर्यटक प्रवासी यांनी आपल्या वाहनांमधील वातानुकुलीत यंत्रणा सुरु ठेवून प्रवास करू नये. त्याचवेळी शक्य असल्याने घाटातून प्रवास करताना एखाद दुसरी ठिकाणी काही मिनिटे थांबून पुढे प्रवास सुरु करावा. म्हणजे गाडीच्या इंजिन वर लोड येणार नाही.