
*नागपूर-* सत्ताधारी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी आज कोकणातील धरणावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. कोकणात सॉयल टेस्टिंगच्या नावाखाली अधिकारी 20 – 20 लाख रुपये काढत आहेत. पण तिकडे सॉयल टेस्टिंग होत आहे का? बघून घ्या. जिओग्राफिकल सर्व्हेच्या नावाखाली लाखो रुपये काढले जात आहेत. पण तिकडे हा सर्व्हे होत आहे का? कोकणात मागच्या 12-15 वर्षांत धरणेच झाली नाहीत. मग पैसे कुठे चाललेत? धरणांची कामे तर होत नाहीत. मी या प्रकरणी सभागृहात लक्षवेधी मांडणार असल्याचे पाहून एका कंत्राटदाराने 4 दिवसांपूर्वी तिकडे दगड टाकण्यास सुरुवात केली. तसेच अधिकाऱ्यांना या वर्षाच्या आत काम पूर्ण करण्याचे सांगितले. यासाठी कारणे काय दिलेत की, लोकांचा विरोध असल्यामु्ळे काम रखडले. पण 2005 मध्ये लोकांचा विरोधही नव्हता. भूसंपादनही झाले आहे. पण अजूनही मला भूसंपादनाचे कारण सांगितले जात आहेत.
माझा प्रश्न हा आहे की, तुम्ही मला यात प्रश्नच उद्धवत नाही असे सांगितले आहे. मग आम्ही प्रश्न काय विचारायचा? मी फक्त तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो व आमच्या कोकणावर अन्याय का करता? एवढाच प्रश्न विचारू शकतो. एकही धरण झाले नाही. आम्ही 28 वर्षे थांबलोय. एकही वर्ष पूर्ण झाले नाही, असे का याचे उत्तर मंत्र्यांनी द्यावे, असे नीलेश राणे म्हणाले.
त्यांच्या या प्रश्नावर मंत्री संजय राऊत यांनी उत्तर दिले. कुडाळ तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना प्रकल्पाविषयी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न विचारला आहे. सध्या प्रकल्पाची स्थिती मुख्य धरणाचे मातीकाम 80 टक्के पूर्ण झाले आहे. विमोचनाचे कामही पूर्ण झाले आहे. इतर काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे ते म्हणाले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर