पेट्रोल पंपावर बाईक पुढे घेण्यावरुन वाद झाला मामाबरोबर मात्र भाच्याला चाकूने भोसकले.

Spread the love

पोलीसांनी ९ जणांना ठोकल्या बेड्या…

जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | फेब्रुवारी ०२, २०२३.

मुंबईतील मिरा रोड येथे सोमवारी झालेल्या डिलिव्हरी बॉयच्या हत्येप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण या प्रकरणात संबंधित डिलिव्हरी बॉयचा नाहक बळी गेला. मामाला मारण्याऐवजी मारेकऱ्यांनी भाच्याची हत्या केली. पेट्रोल पंपावर बाईक पुढे घेण्याच्या किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे.

मिरा रोडच्या जांगीड सर्कलजवळ ३० जानेवारी रोजी अंकुश राजेशकुमार राज या २० वर्षीय तरुणाची भर रस्त्यात नऊ जणांनी चाकू भोसकून हत्या केली होती. या घटनेचं सीसीटीवी फुटेजही ही व्हायरल झालं होतं. सीसीटीवी फुटेजच्या आधारे काशिमिरा गुन्हे शाखा क्र. १ ने या हत्याकांड प्रकरणात नऊ जणांना अटक केली. त्यांच्यावर भा.दं.वि. कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या सगळ्यांची चौकशी केली असता, त्यातून समोर आलेलं कारण आश्चर्य करणारं होतं.

अंकुश राज हा एका ई-शॉपिंग कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. मृत अंकुशचा मामा हर्ष राज आणि आरोपी आयुष भानूप्रसाद सिंह यांच्यात पेट्रोल पंपावर बाईक पुढे घेण्यावरुन किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी मयत अंकुशने हा वाद मिटवलाही होता. मात्र काही वेळाने आरोपी आपल्या साथीदारांसह हर्षला शोधत आले. यावेळी त्यांना अंकुश दिसला. तो काही कामानिमित्त एका ठिकाणी उभा होता. त्यावेळी नऊ जणांनी त्या ठिकाणी येत अंकुशवर प्राणघातक हल्ला केला. या आरोपींनी चाकूने भोसकून अंकुशला गंभीररित्या जखमी केलं आणि हल्ला करुन सर्व आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकुशला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी या प्रकरणात नऊ आरोपींना अटक केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page