मुंबई- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डायांनी बुधवारी मुंबईतील सहाहीलोकसभा मतदारसंघांची आढावाबैठक घेतली. बैठकीनंतर मुंबईतीलभाजपच्या तिन्ही विद्यमानखासदारांना बदलण्याची आणिकेंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासाठीसुरक्षित जागेचा शोध सुरूअसल्याचा जोरदार चर्चा राजकीयवर्तुळात सुरू झाली. यानंतर विद्यमानखासदार गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई),मनोज कोटक (ईशान्य मुंबई) आणिपूनम महाजन (उत्तर मध्य मुंबई)यांच्या समर्थकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
मुंबईतील सहा लोकसभा..
मतदारसंघाच्या निवडणुकीच्या व्यवस्थापनसमितीची दुसरी बैठक बुधवारीभाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डायांच्या उपस्थितीत मुंबई येथे पारपडली. या व्यवस्थापन समितीतअसलेल्या वेगवेगळ्या ३६ विभागाचेप्रमुख तसेच आमदार व खासदारउपस्थित होते.
कार्यकर्त्यांशी संपर्क,मीडिया व्यवस्थापन, वाहन..
व्यवस्था,महत्वाच्या नेत्यांच्या सभेचेआयोजन, सोशल मीडियाचा प्रभावीवापर व समाजातील प्रमुख व्यक्तींचासहभाग याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनीसमितीला मार्गदर्शन केले.
गेल्याअनेक वर्षातील त्यांच्या अनुभवाचेसार बुधवारी त्यांच्या भाषणात दिसतहोते. बैठकांतील सातत्य पक्षाचेविचार अंतिम मतदारापर्यंतपोहोचवण्यासाठी लागणारी साखळी,तसेच विरोधकांच्या मुद्द्यांनासडेतोड उत्तर देण्यासाठी रणनीतीतयार करण्याच्या सूचना अध्यक्षांनीदिल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काहीमहिन्यांपासून पूनम महाजनभाजपच्या कार्यक्रमात दिसल्यानव्हत्या. त्यामुळे महाजन यांना यंदालाेकसभेची उमेदवारी देण्यातयेणार नाही, असे संकेत मिळतआहेत. एकूणच याबाबत महाजनयांनी अजून तरी काहीही वक्तव्यकेले नाही.