समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीचा मुंबईला धोका
मुंबई : संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी जगभरातील हवामान बदलाबाबत चिंता व्यक्त करत अनेक देशांना इशारा दिला आहे. अँटोनियो म्हणाले की, मुंबई आणि न्यूयॉर्कसारख्या शहरांना समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीमुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जगभरातील देशांना हवामान बदलाच्या संकटाशी सामना करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील. समुद्राची वाढणाऱी पाणी पातळी आपलं भविष्य बुडवत आहे. हे आपल्यासमोरचं मोठं संकट आहे.
जगभरातली लहान बेटं, विकसनशील राज्ये आणि सखल भागांमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांसाठी यूएन सुरक्षा परिषदेत ‘समुद्राच्या पातळीत वाढ – आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी उपाय’ यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, गुटेरेस म्हणाले की, समुद्राच्या बातळीत वाढ होणं हे चिंतेचं कारण आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे अनेक शहरं, सखल भाग आणि अनेक देशांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं.
गुटेरेस म्हणाले की, गेल्या ३,००० वर्षांचा अभ्यास केला तर आतापर्यंतच्या कोणत्याही शतकापेक्षा १९०० नंतरच्या शतकात समुद्राच्या जागतिक पातळीत मोठी वाढ झाली आहे. समुद्राची पातळी वाढण्याची सरासरी अलिकडच्या दोन शतकांमध्ये वाढली आहे. जागतिक महासागर गेल्या शतकात गेल्या ११,०० वर्षांतील कोणत्याही काळापेक्षा अधिक वेगाने गरम झाला आहे. जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित असली तरीही समुद्र पातळीत वाढ होईल.
मुंबई-ढाका शहराला धोका
गुटेरेस म्हणाले की, समुद्राची पातळी वाढू लागल्याने जवळपास सर्वच खंडातील मोठ्या शहरांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. यामध्ये कैरो, लागोस, मापुटो, बँकॉक, ढाका, जकार्ता, मुंबई, शांघाय, कोपनहेगन, लंडन, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, ब्युनोस आयर्स आणि सॅंटियागोसारख्या शहरांना मोठा धोका आहे
जाहिरात :