डिजीटल दबाव वृत्त
मुंबई: छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतागृहातून मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या मालाची किंमत लाखोंच्या घरात असल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातून १ लाख रुपयांचे नळ चोरीला गेले आहेत.
रेल्वेने प्रवाशांसाठी बांधलेल्या एसी टॉयलेटमधून नळ चोरीला गेले आहेत. रेल्वेने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी जीआरपीने गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा जीआरपी तपास करत आहे. सीएसएमटीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. अशात आता चोरट्यांनी टॉयलेटचं सामानही सोडलं नाही. टॉयलेटमध्येही त्यांनी १ लाखाची चोरी केली आहे.५ स्टार टॉयलेटमधून १ लाख रुपयांचा माल चोरीला गेला आहे.
चोरीच्या मालाची किंमत लाखोंच्या घरात
७ फेब्रुवारीला ही चोरी झाली असल्याचं बोललं जात आहे. या कालावधीत जेट स्प्रे, टॉयलेट सीट कव्हर, नळ, बॉटल होल्डर आणि स्टॉपकॉक्स अशा अनेक वस्तू लंपास केल्या गेल्या आहेत. लाईव्ह हिंदुस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘हे एका आतल्याच व्यक्तीचं काम असल्याची शक्यता आहे, कारण केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच रनिंग रूममध्ये प्रवेश करता येतो.’
कंत्राटदार कामगार कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग असू शकतो. स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे ओळख पटवणं कठीण होत आहे’. विशेष बाब म्हणजे ४ जानेवारीलाच AC टॉयलेट प्रवाशांसाठी खुले करण्यात आले होते. यानंतर काहीच दिवसांत ही चोरीची घटना घडली आहे.
जाहिरात