
रत्नागिरी शहरात भगवती किल्ल्यावर हा धक्कादायक प्रकार घडल्याच समजल्यानंतर तात्काळ पालकमंत्री उदय सामंत यांनीही भगवती किल्ला परिसराकडे अधिकाऱ्यांसमवेत भेट दिली व व परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा नागरिकांच्या सुरक्षा आदीसंबंधित काही सूचना दिल्या.आत्महत्या करायची असते तर नाशिक मध्ये केली असती रत्नागिरीत कशाला आली असती..हरामजादेने मेरी बेटीको..वडिलांचा सवाल
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील भगवती किल्ल्यावरून पडलेली ती युवती कोण याचा शोध रत्नागिरी पोलीस घेत होते. मात्र या प्रकरणाचा आता उलगडा झाला आहे. मात्र या पडलेल्या युवतीचा शोध अद्याप लागलेला नाही. ही युवती पडल्यानंतर एका महिलेचा मृतदेह समुद्रात समोर तरंगताना दिसत असतानाची माहिती एका पर्यटकान रत्नागिरी शहर पोलिसांना दिली होती. हा सगळा धक्कादाय प्रकार गेल्या रविवारी सकाळी 11 ते 12 घडला होता. नाशिक येथील एका राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या बँकेत कर्मचारी होती.
सुखप्रीत प्रकाश धाडेवाल (वय 25) असं या तरुणीचं नाव होतं. याच युवतीने रत्नागिरीत येऊन ही आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा संशय आहे. भगवती किल्ला समोर ती ज्या ठिकाणी पाय पसरून बसली होती त्या ठिकाणी ओढणी, तिची चप्पल या चीजवस्तू पोलिसांना मिळाल्या होत्या. या वस्तू तिच्या घरच्यांनी रत्नागिरी येथे येऊन ओळखल्या आहेत. अशा स्वरूपाच्या टोकाचे पाऊल उचलण्याच नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण एकतर्फी प्रेमातून हा धक्कादायक प्रकार घडला असावा असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.हे कुटुंब मूळचे हरियाणातील आहे. मात्र, ते नाशिक येथे वास्तव्यास आहे. सुखप्रीत या युवतीने रत्नागिरी येथे येऊन गेल्या रविवारी भगवती किल्ल्यावरून उडी घेत टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. नाशिक येथून ही बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी नाशिक पोलिसात दिली होती. तिची आई, वडील, भाऊ, नातेवाईक रत्नागिरी येथे आल्यानंतर त्या अज्ञात तरुणीच्या भगवती किल्ल्यावरून बेपत्ता होण्याचे गूढ उलगडल आहे. नाशिक येथून रत्नागिरी येथे आलेल्या या युवतीने नाशिक येथील घरी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ही सुसाईड नोट रत्नागिरी पोलिसांना तिच्या पालकांनी दिली आहे.
रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात पडून झालेल्या सुखप्रित कौर या तरुणीच्या मृत्यू प्रकरणाला आता एक नवे आणि अंत:करण हेलावून टाकणारे वळण मिळाले आहे. आपल्या लेकीच्या अशा अचानक आणि दु:खद अंतामुळे सुन्न झालेल्या वडिलांनी आज रत्नागिरीत येऊन घटनास्थळाला भेट दिली. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी एकच आर्त सवाल केला,“माझी मुलगी आत्महत्या करणार नव्हती… तिचा घात झाला आहे!”

“नाशिकमध्ये आत्महत्या केली असती, रत्नागिरीला का आली?” – व्यथित वडिलांचा सवाल
सुखप्रितचे वडील प्रकाशसिंह कौर यांनी उपस्थित केलेले प्रश्न प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज अधोरेखित करतात. “जर तिला खरोखर आत्महत्या करायचीच होती, तर ती नाशिकमध्ये केली असती ना? रत्नागिरीला का आली?” असा सवाल त्यांनी अत्यंत व्यथित मनाने केला. सुखप्रित ही नाशिकमधील आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. तिच्या राहत्या ठिकाणी पोलिसांना मिळालेल्या बॅगेत एक चिठ्ठी सापडली त्यात तिने लिहिले आहे की, “मी संकटात अडकले आहे. मी कोणाला सांगू शकत नाही. मी काय करू? मला समजत नाही.”
‘त्या’ तरुणावर संशयाची सुई, वडिलांचा कडवट आणि दुःखद आरोप
ही घटना घडण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, म्हणजे शुक्रवारी, सुखप्रितने आपल्या वडिलांना फोन केला होता. त्यानंतर शनिवारीपासून तिचा फोन पूर्णतः बंद आला.
या संदर्भात बोलताना प्रकाशसिंह कौर यांनी भावनांचा बांध फोडत अत्यंत गंभीर आरोप केला ,“हरामजादेने फोन केला. तोच मुलगा तिला फोन करत होता.”
हे बोलताना त्यांचा स्वर केवळ संतापाचा नव्हता, तर हतबलतेने भरलेला होता.एका वडिलांचा, ज्यांनी आपली मुलगी गमावलेली आहे आणि न्याय मागण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरलेले नाही.
सुखप्रित काही काळापूर्वी मनीपाल कॉलेज, बेंगळूरु येथे बँकेच्या प्रशिक्षणासाठी गेली होती. तिथेच एका तरुणाशी तिची ओळख झाली होती. तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या तरुणाने प्रेमाचे खोटे नाटक रचले आणि तिच्या भावनांशी खेळ केला.
याच तरुणाच्या ओळखीमुळे ती नाशिकहून दोन वेळा रत्नागिरीला आली होती, असे तिच्या मैत्रिणीने कुटुंबीयांना सांगितले आहे.
“हरामजादेने मेरी बच्ची का घात किया”
सुखप्रितच्या वडिलांनी रत्नागिरीतील बँकेत काम करणाऱ्या जोशन नायक नावाच्या तरुणाकडे संशय व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं – “ती यापूर्वीही त्याला भेटायला आली असेल. हरामजादेने मेरी बच्ची का घात किया.” ही आरोळी ऐकणाऱ्यालाही अंतर्मनात दुख: झोंबेल इतकी ती वेदनादायी आहे.
या साऱ्या घटनांवरून स्पष्ट होतं की, हा मृत्यू निव्वळ आत्महत्या नसून, त्यामागे काहीतरी गंभीर आणि काळोखात लपलेलं कारण असावं, असा संशय बळावतो आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे आणि लवकरच या दु:खद प्रकरणामागचं सत्य उजेडात येईल, अशी साऱ्यांना आशा आहे.