
रत्नागिरी : जयगड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील वाटद खंडाळा येथे मदन मोहन कामटी (वय ३५, रा. बिहार सध्या रा. वाटद खंडाळा येथील संतोष फगारे यांच्या चाळीत) हा भाड्याच्या घरात सिलिंग फॅनला टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून घेतलेल्या स्थितीत मिळून आला. त्यानंतर त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे उपचारासाठी आणण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात शनिवारी दुपारी नोंद करण्यात आली. मदन कामटी हा दारुचा व्यसनी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*