आरवली ते बावनदी अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम रखडले,खड्डे, धूळ आणि वेड्यावाकड्या वळणामुळे अपघातात वाढ,बावनदी, सोनवी, कोळंबे, शास्त्री पुलाची कामे गेली १७ वर्षे रखडलेलीच!…

Spread the love

दीपक भोसले/संगमेश्वर- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील अपघात प्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम गेले अनेक वर्ष रखडले आहे. आरवली ते बावनदी या अपघात प्रवण क्षेत्रातील संगमेश्वर ओझरखोल ते तुरळ या पट्ट्यातील चौपदरीकरणाच्या रस्त्याचे काम रखडले आहे. रखडलेल्या कामामुळे अपघातांमध्ये वाढ झाली असून निष्पाप प्रवासी, वाहन चालक यांचा नाहक बळी जात आहे. रखडलेल्या कामांमुळे कच्च्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. संगमेश्वर शास्त्री पूल, सोनवी पुलाजवळ धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. चौपदरीकरणाचे  काम सुरू  असताना अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच बनवण्यात आलेले जोड रस्ते ही धोकादायक बनलेल्या आहेत अनेक वेळा याच ठिकाणी अपघात घडत आहेत. अपघात प्रवाह क्षेत्रामध्ये धोकादायक वळणे अजूनही हटवण्यात न आल्याने त्या ठिकाणी पूर्वीसारखी अपघात घडत आहेत. संगमेश्वर पैसाफड हायस्कूलच्या समोर अनेक वेळा खड्डे पडूनही वारंवार सांगूनही ठेकेदार अजूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे .

पावसाळी ब्रेकनंतर महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू  करण्यात आहे आहे मात्र काम सुरू असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे .त्यामुळे प्रवासी वाहन चालक यांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संगमेश्वर दरम्यान रखडले आहे .रखडलेल्या कामाचा मोठा फटका प्रवाशांना आणि वाहन चालकांना बसत आहे मोठ्या वाहनांमुळे सिमेंट अथवा खड्ड्यात टाकलेल्या खडीची धूळ मोठ्या प्रमाणात परिसरात पसरत असून धुळीचे संसर्गजन्य रोग प्रवाशांना होत आहेत .एका बाजूला बदलते वातावरण आणि त्यामुळे बसणारा फटका त्या दुसऱ्या बाजूला धुळीचे साम्राज्य यामुळे संगमेश्वरवाशियाना त्रास सहन करावा लागत आहे.

संगमेश्वर तालुक्यातील बावनदी सोनवी कोळंबे या पूलांची कामे संथ गतीने सुरू आहेत त्याचा फटका वाहतूक कोंडी ला बसत असून अर्धा तासाच्या प्रवासाला दोन ते तीन तास प्रवास वेळ लागत असल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page