चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील १.८० कि.मी. लांबीच्या उड्डाण पुलाचे काम आता वेगाने सुरू झाले आहे. या पुलाच्या ४६ पिलरचे बहुतांशी काम पूर्ण झाल्याने ठेकेदार कंपनीने त्यावरील गर्डरच्या कामाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी क्रेन व इन्य यंत्रणा भारण्याची तयारी बहाद्दूरशेख नाका येथील वाशिष्ठी पुलाच्या बाजूने सुरू केली आहे. येत्या १५ दिवसात गर्डर टाकण्याच्या कामास सुरूवात होणार असल्यामुळे उड्डाण पुलाचे काम जलगदगतीने पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांकडून समजते.
जाहिरात