
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) दिवा विभागाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने दिवा विभागात तीव्र पाणी टंचाई जाणवते. मात्र येत्या काही दिवसात संपूर्ण दिवा विभागाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार असल्याचे मा. महापौर रमाकांत मढवी यांनी सांगितले. दिवा म्हसोबा नगर येथील नवीन सब लाईन याची पहाणी केली विरोधक जरी आरोप प्रत्यारोप करीत असले तरी आम्ही व माझे बाळासाहेबांचे शिवसैनिक दिव्याच्या विकासासाठी अग्रेसर आहोत आणि ह्या पुढे राहू,

दिवा येथील म्हसोबा नगर येथील नवीन ब्राँच पाहणी करता प्रसंगी बोलत होते. दिवा विभागात पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कल्याण फाटा येथून एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरून साबे व दिवा विभागाकरिता नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे, दिवा विभागातील बाळासाहेबांचे शिवसैनिक प्रयत्नशील राहतील येत्या काही दिवसात दिवा विभागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. अशी ग्वाही मा.उप.महापौर रमाकांत मढवी यांनी दिली.पाहणी दौऱ्या दरम्यान नगरसेविका सौ. सुनीता मुंडे, सौ. दर्शना चरणदास म्हात्रे, नगरसेवक श्री. दीपक जाधव साहेब, विभागप्रमुख श्री. चरणदास म्हात्रे, श्री. शशिकांत पाटील, शाखाप्रमुख श्री. शिवदास पाटील, श्री. सुरेश पाटील, श्री. धनंजय बेडेकर, श्री. अरुण म्हात्रे यांस समवेत विभागातील अनेक महिला – भगिनी व कडवट शिवसैनिक उपस्थित होते
