
श्रीकृष्ण खातू / संगमेश्वर प्रतिनिधी – गेली अनेक वर्षे संगमेश्वर तालुक्यातील श्री शिवाजी विद्या मंदीर कळंबुशी नं.१या शाळेतील मुलांना उन्हाळ्याच्या शेवटी पिण्याच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागत होते.
याकरिता कायमस्वरूपी पाण्याची सोय या शाळेला व्हावी म्हणून पाणी टंचाई आराखड्यात बोअर शाळेच्या मागणीनुसार ग्राम पंचायतीने सुचवली होती.यासाठी ग्राम पंचायत सरपंच सचिन चव्हाण, इतर ग्राम पंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदेश ठिक,उपाध्यक्ष सचिन वरवटकर,मुख्याध्यापक बारगडे व्यवस्थापन समिती यांनी वारंवार या बोअरसाठी पाठपुरावा केला. त्या साठी देवरुख,रत्नागिरी येथे फेऱ्याही मारल्या.

पण रत्नागिरी जिल्हा पालक मंत्री उदयजी सामंत, चिपळूण संगमेश्वरचे कार्यसम्राट आमदार शेखर निकम,व संगमेश्वरचे गटविकास अधिकारी भरत चौगुले यांच्या विशेष सहकार्यामुळे सदर बोअर मंजूर झाली.
नुकतीच संबधीत यंत्रणेद्वारे शाळेला बोअर मारण्यात आली.व भरपुर पाणी बोअरला लागले असून शाळेला पाण्याची उत्तम सोय झाली.
या कामी पालकमंत्री उदयजी सामंत साहेब ,आमदार शेखरजी निकम साहेब, गटविकास अधिकारी भरत चौगुले यांचे ग्राम पंचायत, शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले आहेत.