खाडीत मासेमारी करताना दुर्दैवी मृत्यू : अणसुरे येथील युवकाचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला…

Spread the love

राजापूर – राजापूर तालुक्यातील अणसुरे म्हैसासुरवाडी येथील नवनाथ नाचणेकर (वय ३१) या युवकाचा मासेमारी करताना समुद्रात बुडून मृत्यू झाला. दोन दिवसांच्या शोधानंतर मंगळवारी (२४ जून) सायंकाळी त्याचा मृतदेह शेवडीवाडी खाडीकिनारी आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ नाचणेकर २४ जून रोजी सकाळी मासेमारीसाठी समुद्रात गेला होता. मासे पकडून तो परत येत असतानाच अचानक समुद्रात भरती आली. त्यामध्ये तो अडकल्याने पाण्यात बुडाला आणि त्यानंतर तो दिसेनासा झाला.

याप्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. सकाळी १० वाजता याबाबत नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे अखेर २४ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा मृतदेह शेवडीवाडी खाडीकिनारी पाण्यात सापडला.

या घटनेमुळे नाचणेकर कुटुंबियांवर आणि अणसुरे परिसरावर शोककळा पसरली आहे. नाटे पोलिसांनी याची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page