
विजयदुर्ग – शिवछत्रपतींच्या दूरराष्टीची साक्ष पटवणारा एक पुरावा विजयदुर्गजवळील समुद्राच्या पाण्यामध्ये आहे. किल्ल्याजवळ शत्रूची जहाजे येऊ नयेत, यासाठी महाराजांनी पाण्याखाली बांधलेल्या भिंती कॅमे-यामध्ये पकडण्यात यशआले आहे.
विजयदुर्ग हा किल्ला शिलाहारांच्या साम्राज्याच्या वेळेस राजा भोजने बांधला होता. पुढे तो वेगवेगळ्या साम्राज्याचा भाग होत होत, शिवाजी महाराजांच्या हस्ते साम्राज्याला जोडला या किल्याचे मूळ नाव घेरीया शिवाजी महाराजांनी ते बदलून विजयदुर्ग असं केलं.
मराठ्यांच्या नाविक दळाचं मुख्य केंद्र या विजयदुर्ग किल्ल्यावर होत. किल्ला महाराजांच्या ताब्यात आल्यावर तो अधिकाधिक भक्कम होण्यासाठी म्हणून महाराजानी या किल्ल्याभोवती तिहेरी तटबंदी उभारली. या किल्ल्याने अनेक लढाया पाहिल्या.
समुद्रावर वर्चस्व गाजवणाया अनेक युरोपियन सताना या किल्ल्याने पाणी पाजलं होतं. युध्दकाळात युरोपियन बनावटीच्या नौका इथल्या समुद्रात फुटुन बुडायच्या हे असं का होत याचा जेव्हा अधिक शोध घेतला गेला तेव्हा किल्ल्याच्या पश्चिम दिशेला पाण्याखाली एक दगडी बांधकाम ओशियनोग्राफी इंस्टिट्युटने केलेल्या संशोधनात लहान मोठे दगड एकमेकांवर अडकवून केलेली एक दगडी रचना त्यांच्या अहवालातही ही भिंत मराठा कालीन असून याचा वापर शत्रुची जहाज बुडवण्यासाठी केला जायचा अशी नोंद आहे.या भिंतीची पाण्याखालची बांधणी पाहून तेव्हाचे बांधकाम शास्त्र किती प्रगत होतं याची प्रचिती येते.