नळाला चक्क गटाराचे पाणी; बीड जिल्ह्यातला प्रकार

Spread the love

बीड – बीडच्या गेवराई शहरातील सावतानगर भागामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला चक्क गटाराचे पाणी येत असल्याचे दिसून आले. यामुळे आमच्या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून या प्रकाराला जबाबदार कोण असा संतप्त सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सावता नगर भागांमध्ये दरवर्षी नळपट्टीचा भरणा केला जातो. तरीही त्या भागातील पाणीपुरवठ्याबद्दल नगर परिषद प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. या भागात लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल असे नगर परिषद मुख्याधिकारी यांनी सांगितले तर स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास अस्वच्छ पाण्याने प्रशासकास आंघोळ घालण्याचा इशारा माजी नगरसेवक राधेश्याम येवले यांनी दिला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page