चिपळूण : चिपळूण शहरातील मध्यवर्तीएस्.टी. बस स्थानकात गस्त घालणाऱ्या पोलिसांना दोन तरुणांबद्दल संशय आल्याने त्यांना हटकले असता त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे एक मोबाईल व घड्याळ सापडले आहे. ही घटना काल सोमवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली. चिपळूण पोलीस ठाण्याच्या डी. बी. शाखेचे हवालदार वृशाल शेटकर, संदीप मानके, पवार, श्री. कदम आदी मध्यवर्ती एस्. टी. स्टॅण्डवर गस्त घालीत असताना दोन तरुण संशयितरित्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता घाबरल्याने त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी एकाला स्टॅडवरच पकडले तर दुसऱ्याचा प्राठलाग करून पकडले, एकाचे नाव एडल्ना नागराजू (रा. मिरपेठ, हैद्राबाद) तर दुसऱ्याचे नाव पुसाला कल्याण (रा. रंगारेडी, आंध्र प्रदेश) अशी आहेत. त्यांच्याकडे एक चोरीचा मोबाईल व घड्याळ सापडले. पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत. डी. बी. पथकाने केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.