खेड : खेड रेल्वे स्टेशनवर कार्यरत असणारे रेल्वे कर्मचारी निलेश मोरे यांनी कोकण रेल्वे मार्गा वरून धावणारी कोंकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस मंगळवारी येथील स्थानकात दाखल झाली. मात्र यात खेड तालुक्यातील जामगे गावची १४ वर्षीय स्वानंदी अनंत काणेकर (सध्या रा.गोरेगाव, मुंबई) येथे जात असताना आपले आई वडील व भाऊ यांच्या बरोबर गाडीमध्ये चढत असताना आईचा हात सुटून गेल्याने पटकन गाडीमध्ये चढली. मात्र गर्दी असल्याने तिचे आई वडील,भाऊ बाहेरच राहिले आणि अचानक गाडी सुटून मार्गस्थ झाली. मात्र तेथे कार्यरत असलेले निलेश मोरे यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी पुढील स्टेशनला संपर्क करत त्या मुलीजवळ संपर्क कसा होईल यासाठी प्रयत्न सुरु करून स्वानंदीची आणि तिच्या आई वडिलांची पुन्हा भेट घालून दिली.
१४ मार्च रोजी रात्रीच्या गाडीने आपल्या गावाकडचा शिमगा सण साजरा करून काणेकर कुटुंब खेडवरून गोरेगावकडे जाण्यासाठी निघाले होते. नेहमी प्रमाणे या गाडीला प्रचंड गर्दी असल्याने स्वानंदी आपल्या कुटुंबासमवेत गाडीमध्ये जाण्यासाठी गर्दीचा एक भाग झाली होती. या गर्दीत गाडीमध्ये चढत असताना आपल्या आईचा हात केव्हा सुटला हे तिलाच कळले नाही. आणि या गर्दीमध्ये तीच कुटुंब बाहेरच राहिले. आणि हि बाब स्वानंदीच्या लक्षात येईपर्यंत गाडी सुटली होती. आपली मुलगी गाडीमध्ये बसून गाडी सुटल्याचे लक्षात येताच आईवडील रडू लागले. हा सगळा प्रकार कर्तव्यदक्ष रेल्वे कर्मचारी निलेश मोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी काणेकर कुटुंबियांना धीर देत ताबडतोब पुढील करंजाडी स्टेशनला गाडी थांबवून एक रेल्वे कर्मचारी पाठवून मुलीला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी करंजाडी स्टेशन मास्टर यांच्याशी फोन वरून स्वानंदीच्या आईवडिलांजवळ बोलणे करून दिले. व मुंबई कडून मडगावला जाणारी २०१११ कोंकणकन्या गाडीत बसवून पुन्हा खेड स्थानकात पाठवण्यात आले.
निलेश मोरे यांनी केलेल्या या कामाबद्दल सर्व परिसरातून व त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच स्वनंदीच्या आईवडिलांनी मोरे यांचे आभार मानले.