
भुसावळ | महाराष्ट्रातील भुसावळमध्ये गुरुवारी एक विचित्र घटना घडली. एका प्रवाशाला वाचवण्यासाठी ट्रेन विरुद्ध दिशेने धावू लागली. गाडी विरुद्ध दिशेने जाऊ लागल्याने प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.
हे विचित्र दृश्य पाहून प्रवासी गोंधळात पडले, मात्र सत्य कळताच प्रवाशांनी चालक आणि गार्डच्या समजूतदारपणाचे कौतुक केले. खरं तर, देवळाली-भुसावळ पॅसेंजर ट्रेनमधून एक प्रवासी खाली पडला होता, त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी ट्रेन चालकाने हा निर्णय घेतला.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९.३० वाजता परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. हे रेल्वे स्थानक जळगावपासून जवळ आहे. मुंबईपासून त्याचे अंतर सुमारे ४२५ किलोमीटर आहे. मात्र चालकाच्या या कृत्यामुळे त्याला बक्षीस देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.