साप पाहताच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. काही जण तर साप दिसताच वाट मिळेल तिथे पळत सुटतात. कारण- सापाच्या एका दंशाने माणसाचा मृत्यू होऊ शकतो, असे म्हटले जाते. त्यात विषारी आणि बिनविषारी साप अनेकांना ओळखता येत नाही.
त्यामुळे सापाबद्दलची भीती आणखीनच वाढते. तुम्ही सोशल मीडियावरही घरात साप लपून बसल्याचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. कधी घरातील कोपऱ्यात, तर कधी छतावर हे साप लपून राहतात; पण हे साप कधी व कोणत्या परिस्थितीत घरात शिरतील ते सांगता येत नाही. अशाच प्रकारे घरात शिरणाऱ्या एका महाकाय सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात एक भलामोठा साप घरात झोपलेल्या बाळाच्या झुल्याखाली येऊन बसतो अन् त्यानंतर पुढे काय घडते ते आता तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून खरेच तुमच्याही अंगावर काटा येईल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला झुल्यावर आपल्या बाळाला कुशीत घेऊन झोपलेली असते. बाळ झोपत असतानाच ती झुल्यावरून उतरते आणि फरशीवर बसते. याचदरम्यान एक महाकाय साप घराच्या उघड्या दारातून घरात शिरतो आणि झुल्याच्या अगदी खाली येऊन बसतो. महिला बाळाला झोका देण्यात व्यग्र असताना तो महाकाय साप बाळाच्या झुल्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचतो. काही क्षणांत तो बाळाच्या दिशेने झडप घालणार तोच ती महिला प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत बाळाला झुल्यातून उचलून पळ काढते. त्यानंतर सापही कोणालाही इजा न करता आल्या वाटेने पुन्हा बाहेर जातो. सध्या हा व्हिडीओ पाहून युजर्स हैराण झाले आहेत.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंटद्वारे लोकांना आवाहन केले की, साप, अजगर व बोआ कन्स्ट्रिक्टरचा धोका लक्षात घेता, लोकांनी कधीही घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपू नका.