
ठाणे ठेकेदाराने पालिका अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून पैसे काढले
ठाणे ; निलेश घाग ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून महापालिकेच्या लेखा विभागाकडून ५ लाख १० हजार २५१ रुपये सुरक्षा अनामत रक्कम काढून घेतल्याचा आरोप भाजपा ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी केला आहे
तिघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदार कंपनीला तत्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध शौचालयांची दुरुस्तीच्या कामाचा ठेका Janhavi Construction कंपनीचे मालक संजय घोसाळकर यांना २०१७ मध्ये देण्यात आला होता. १ कोटी ७७ लाख ५२ हजार रुपयांचा ठेका होता. या ठेक्यासाठी कंपनीने महापालिकेत ५ लाख १० हजार २५१ रुपयांची अनामत रक्कम जमा केली होती. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सुधीर सोनवणे, उप अभियंता शैलेंद्र चारी आणि कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून अनामत रक्कम काढून घेण्यात आली आहे.
जाहिरात



