ठाणे: मार्च महिन्यात वर्षातला सर्वात पहिला उष्ण दिवस १८ फेब्रुवारी ठरला होता. त्यानंतर सोमवार एप्रिल महिन्यातला सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, बदलापूर आणि कल्याण शहरात पारा चाळीशीपार झाला होता. तर बहुतांश शहरातील तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्याचा अनुभव येत होता. आणखी चार ते पाच दिवस तापमानात अशीच वाढ होणार असल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासकांनी दिली आहे.
तापमानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे मार्च महिन्यात पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा अशा तीनही ऋतुंचा अनुभव आला. होता. मार्च महिन्याच्या सुरूवातीला धुळवडीने धावपळ उडवली होती. त्यानंतर तापमानात वाढ झाली. दुसऱ्या आठवड्यात १६ मार्च रोजी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर तापमानात घट पाहायला मिळाली होती. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट नोंदवली जात असतानाच हिवाळ्याचा अनुभव येत होता. एप्रिल महिन्यात सुरूवातीला ढगाळ वातावरण होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. बदलापुरातील खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.