मुंबई-गोवा महामार्गावरील समस्या मार्गी न लागल्याने शिवसेनेचा बुधवारी सावर्डेत रास्ता रोको

Spread the love

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे सुरू असलेले काम व त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या विविध समस्या निकाली न निघाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंतर्फे बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवसेना गुहागर मतदार संघ चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामाची प्रगती चांगली असली तरी मुख्यतः कोंडमळा, सावर्डे, असुर्डे, वहाळ फाटा अशा तीन ठिकाणी सर्वसामान्य स्थानिक नागरिक व वाहन चालकांना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या तात्काळ निकाली काढणे गरजेचे आहे. आपल्या निदर्शनास त्या सर्व समस्या स्थानिक नागरिक आणून देत आहे. तरी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना आपल्याकडून देण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

Please wait while flipbook is loading. For more related info, FAQs and issues please refer to DearFlip WordPress Flipbook Plugin Help documentation.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page