
कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह अधिकाऱ्यांच्या वरद हस्तांमुळेच असताना निष्कृष्ट दर्जाचे…
मोसाडा/खेड/ प्रतिनिधी- खेडमधील मसाला मध्ये डिसेंबर ते जानेवारी दरम्यान करण्यात आलेल्या गटाराच्या कामाला बघदाड पडले आहे. सदरचे काम हे जिल्हा पंचवार्षिक योजनेतून करण्यात आले होते. कॉन्ट्रॅक्टर पवार यांनी सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे केलेले असून सदर कामाची चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. लोकांमध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की सदरचे काम हे अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाल्यामुळे निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे. सदरचा पडलेला खड्डा हा गटावरून गाडी गेल्यानंतर पडला आहे. यावरून कामाचा दर्जा समजून येतो.
कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या कामाची चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे . कॉन्ट्रॅक्टर दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची ही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. सदरची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने सदर कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचेही ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. सदरचा रस्ता हा चिपळूण व खेडला जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे अशा रस्त्यावरची अशी कामे करणे हे अयोग्य आहे तरी सदर विषयाची दखल घेऊन कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.