जुन्या पुलावरील वाहतूक कोंडी मुळे वाहचालक व प्रवासी त्रस्त……रुग्ण उपचारासाठी जात असताना तिथे होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे हाकनाक बळी जाऊ शकतो याला जबाबदार कोण ?…… असा संतप्त सवाल विचारला जात आहे…..
शास्त्रीपुलावर नेहमीच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रशासनाने तात्काळ मार्ग काढावा – आमदार शेखर निकम

श्रीराम शिंदे / संगमेश्वर :-
ब्रिटिश कालीन शास्त्रीपुल हा अतिशय धोकादायक असताना चौपदरीकरणानाच्या कामात पुलाचे काम संत गतीने का होईना पण पूर्णतःवास गेले असे बोलले तर वावगे ठरणार नाही मात्र ढीम्म पद्धतीने काम करण्याची सवय झाल्या मुळे दोन्ही साईड च्या बाजूचे काम अपूर्ण ठेवून त्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे तोंडावर मान्सून येऊन ठेपला तरी देखील नवीन पूल वाहतुकीस चालू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाही आहेत.


अशातच नेहमीच शास्त्रीपूल येथे वाहतूक कोंडी होते व वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या जातात अश्या वेळी एकादी ऍम्ब्युलन्स तातडीने उपचारासाठी रुग्णाला घेऊन जात असेल तर मात्र कोणताच पर्याय उपलब्ध होत नाही पर्यायी ऍम्ब्युलन्स मध्ये असणाऱ्या रुग्ण दगवण्याची भीती निर्माण होऊ शकते अश्या अनेक बाबी मुळे संगमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग व प्रशासनाला या बाबतीत योग्य तो तातडीच्या उपाययोजना करून नवीन पूल तात्काळ किमान एक मार्ग तरी सुरु करावा जेणे करून वाहतूक कोंडी न होता प्रवास थोडा का होईना सुककर होईल प्रशासनाने जर का लक्ष दिले नाही तर शास्त्रीपूल येथे संगमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.....