रत्नागिरी :- पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई – गोवा महामार्गाला दणका दिला आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा ते निवळी यादरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू असलेला रस्ता खचला आहे. सद्यस्थितीत एका बाजूने वाहतूक सुरू आहे .
बुधवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे हातखंबा ते निवळी यादरम्यान चा रस्ता खचला आहे. महामार्ग चौपदरीकरणामध्ये रत्नागिरी तालुक्याच्या हद्दीतील काम आधीच बराच काळ रखडले . आता या कामाने गती घेतली मात्र बुधवारच्या मुसळधार पावसाने चौपदरीकरणासाठी टाकलेला भरावा खचला आणि त्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. सध्या एका बाजूने वाहतूक सुरू आहे. मात्र मातीचा भराव खचणे न थांबवल्यास आणि पुन्हा मुसळधार पाऊस पडल्यास रस्ता आणखी खचण्याची शक्यता आहे.