
चिपळूण ; चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्ता काही ठिकाणी खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याठिकाणी बॅरल उभारून वरवरची उपाययोजना केली असली तरी धोका कायम आहे. याविषयी मनसेचे वाहतुकसेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दखल घेत दगडाने भरलेले बॅलर, झेंडे,आणि पट्टे लावून सावधानतेने प्रवास करण्याचे सूचित केले आहे.रस्त्यावर कोट्यवधीचा निधी खर्च घालणाऱ्या आणि दुर्घटनाग्रस्त ठिकाणी दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकामाला लवकरच जोरदार दणका देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.