देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या गावाच्या ग्रामपंचायतींच्या दरमहा होणाऱ्या मासिक सभांना बसण्याचा अधिकार आहे.
दबाव वृत्त: मित्रांनो, तुम्हाला तुमचे हक्क, अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदारी समजली तर,
तुमचे कल्याण होईल, गावचे कल्याण होईल आणि पर्यायाने देशाचे कल्याण होईल!
महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. पीआरसी १०७७/ २७०३ सीआर (२७३२) दि. १९/९/१९७८ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील मुंबई ग्रामपंचायत (सभा) बाबत नियम १९५९ (क्र. १७६ (२) खंड (७) मधील नियम १ टीप १ मधील ग्रामसभांना उपस्थित राहण्याबाबत तरतूद स्वयंस्पष्ट आहे.
उपरोक्त माहिती नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता देण्यात आली आहे.
जाहिरात