महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल: एकनाथ शिंदेंसह ‘या’ १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार….

Spread the love

सर्वोच्च न्यायालय उद्या (गुरुवारी) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि इतर काही याचिकांवर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायायलाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यामधील काही आमदार विद्यमान सरकारमध्ये मंत्रीपदावर कार्यरत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला एकप्रकारे धक्का बसू शकतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, पाहा संपूर्ण यादी


१. एकनाथ शिंदे, (मतदारसंघ-कोपरी पाचपाखाडी, ठाणे)
२. अब्दुल सत्तार (मतदारसंघ-सिल्लोड, छत्रपतीसंभाजीनगर)
३. संदीपान भुमरे (मतदारसंघ-पैठण)
४. संजय शिरसाट (मतदारसंघ-छत्रपती संभाजीनगर पश्चिम)
५. तानाजी सावंत (मतदारसंघ- भूम, परंडा)
६. यामिनी जाधव (मतदारसंघ-भायखळा, मुंबई)
७. चिमणराव पाटील (मतदारसंघ- पारोळा एरंडोल, जळगाव)
८. भरत गोगावले (मतदारसंघ-महाड, रायगड)
९. लता सोनवणे (मतदारसंघ-चोपडा, जळगाव)
१०. प्रकाश सुर्वे (मतदारसंघ-मागाठाणे, मुंबई)
११. बालाजी किणीकर (मतदारसंघ- अंबरनाथ, ठाणे)
१२. अनिल बाबर (मतदारसंघ-खानापूर, सांगली)
१३. महेश शिंदे (मतदारसंघ-कोरेगाव, सातारा)
१४. संजय रायमुलकर (मतदारसंघ-बुलढाणा)
१५. रमेश बोरणारे (मतदारसंघ-वैजापूर, छ. संभाजीनगर)
१६. बालाजी कल्याणकर (मतदारसंघ- नांदेड उत्तर)

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page