राजापूर पंचायत समीतीच्या शिक्षण विभागातील दहा लाखाच्या धनादेश चोरी व अपहार प्रकरणी दोन्ही आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता…

Spread the love

राजापूर / प्रतिनिधी – राजापूर तालुका पंचायत समिती  कार्यालयातील  शिक्षण विभागात सन २०१३ मध्ये झालेल्या दहा लाखाच्या धनादेश चोरी व अपहार प्रकरणातील त्या दोन्ही आरोपींची राजापूर न्यायालयाचे न्यायाधिश सुरज नलवडे यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त्तता केली आहे. तशी माहिती आरोपींचे वकिल ॲड  समीर कुंटे यांनी दिली आहे.

 राजापुर तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागात दहा लाख रूपयाच्या धनादेशाची चोरी होऊन अपहार झाला असल्याबाबतची फिर्याद तत्कालीन गटशिक्षणाधिकारी तानाजी नाईक यांनी राजापूर पोलीसांत दिली होती. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी वाघू शंकर कोडलकर, संजय दत्ताराम नेवरेकर व या खटल्यातील फिर्यादी असलेले तत्कालीन गटशिक्षणाधिकारी तानाजी भिकू नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपास काम करून राजापूर पोलीस स्थानकातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विलास सुतार यांनी राजापूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी राजापुर न्यायालयात खटला सुरू होता. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने असंख्य साक्षिदार तपासण्यात आले. दरम्यान यातील संशयीत आरोपी संजय नेवरेकर याचा न्यायालयात खटला सुरू असताना मृत्यु झाला. त्यामुळे उर्वरित दोन संशयीत आरोपींविरोधात न्यायालयात हा खटला सुरू होता. यावर झालेल्या सुनावणी अंती बुधवारी २८ मे रोजी राजापूर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.  

दरम्यान या प्रकरणी राजापूर न्यायालयाचे न्यायाधिश नलवडे यांनी बुधवारी निकाल जाहिर केला आहे. या प्रकरणी सबळ पुराव्या अभावी या दोन्ही संशयीत आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

         
या प्रकरणी संशयीत आरोपी वाघू कोडलकर यांच्या वतीने अँड प्रविण सुर्वे, ॲड. समीर कुंटे, तर  तानाजी भिकू नाईक यांच्या वतीने ॲड. यशवंत कावतकर, अँड. विकास पळसमकर,  ॲड   निखिल तेरवणकर यांनी काम पाहिले. 


Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page