
२५ ऑगस्ट/नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा दौरा संपवून ते आज (25 ऑगस्ट) भारतात परतणार आहेत. पण पंतप्रधान मोदींचं विमान दिल्लीत न जाता थेट बंगळुरुमध्ये जाणार आहे. चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या टीमच्या सर्व शास्त्रज्ञांची ते भेट घेणार आहेत. तसेच त्यांचे अभिनंदन देखील करणार आहेत.

चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांची पंतप्रधान भेट घेणार आहेत. पंतप्रधान शास्त्रज्ञांशी चर्चा देखील करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी चांद्रयान 3 च्या यशानंतर इस्रो प्रमुखांशी फोनवरुन संवाद साधला होता. यावेळी लवकरच बंगळुरुला येऊन प्रत्यक्ष भेट घेईल, असं त्यांनी म्हटलं होतं.