महाप्रसाद, खोबरा बर्फीचा प्रसाद घेत मुर्मू म्हणाल्या, ‘खाना अच्छा और स्वादिष्ट है’
श्री क्षेत्र शनिशिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच गुरुवारी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथील शनेश्वर मंदिराला भेट दिली. दीड तास मंदिर परिसरात घालवत राष्ट्रपती मुर्मू यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले. उदासी महाराज मठात अभिषेक, पूजा केली. त्यानंतर त्यांनी चौथऱ्यावर जाऊन श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. त्यानंतर देवस्थानतर्फे दिला जाणारा जेवणाचा महाप्रसाद घेतला. जेवण वाढणाऱ्या संतोष तवले यांना “खाना अच्छा और स्वादिष्ट है’ म्हणत खोबरा बर्फीचा प्रसादही राष्ट्रपती मुर्मू यांनी घेतला.
आजपासून दोन दिवस नागपुरात
शुक्रवारी व शनिवारी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत नागपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.