महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीसाठी गुरव समाजातील बांधवांची उपस्थिती…

Spread the love

*रत्नागिरी* : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे गुरव समाजातील पोट जातींचा इतर मागासवर्ग मध्ये अनुक्रमे 43 मध्ये नोंद घेण्यासाठी बैठक घेण्यात आली.

गुरव समाज आणि पोट जाती यांच्या संदर्भातील विषयावर चर्चा करून मंडल आयोगाच्या सदस्यानी आवश्यक कागपत्रे लवकरच सादर  करण्यास सांगितले. आवश्यक असलेल्या दस्तऐवज लवकरच सादर करू असे गुरव समाजातील राजन गुरव यांनी योग्य बाजू मांडून सांगितले. या कामासाठी हितवर्धक गुरव समाज संस्था मुंबई मार्फत पुढाकार घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्यांचे  जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे हितवर्धक गुरव समाज संस्था संस्थापक अध्यक्ष राजन गुरव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी, गुरव समाज उपाध्यक्ष महेश गुरव, सचिव मोहित चव्हाण,  उपसचिव   संतोष साळवी, सदस्य गोविंद गुरव, तसेच गुरव ज्ञाती समाज मुंबई संस्थेचे विश्वस्त शंकर गुरव, सचिव अनंत बाळाजी गुरव, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष ए के गुरव, सदस्य धनंजय गुरव, जितेंद्र गुरव,  स्वप्नील गुरव आदी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page