
बुलढाणा येथे लोकांच्या दुचाकी चोरून विहिरीत लपवून ठेवणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्या विहिरीतून ७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
जिल्ह्यातील खामगावमध्ये वारंवार मोटारसायकल चोरीच्या घटना पोलिसांसाठी डोकेदुखी ठरल्या होत्या. यानंतर पोलिसांनी कारवाई करत एका दुचाकी चोराला पकडले, ज्याने खामगाव शहरातून ९ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.
आरोपी चोराने सांगितले की, तो दुचाकीचे स्पेअर पार्ट (टायर, बॅटरी, चाक) काढून भंगारात विकायचा आणि दुचाकीचे उर्वरित भाग विहिरीत टाकायचा. ती विहीर शेतात बांधली होती, जेणेकरून कोणाला शंकाही येत नसे.
पोलिसांनी दुचाकी चोरीचा मुख्य सूत्रधार सय्यद वसीम याला अटक केली असून, त्याच्यावर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता आरोपीकडून दुचाकी चोरीमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि तो दुचाकीचे पार्ट्स कुठे विकायचा, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.