
नागपूर; केंद्र सरकारने आय.पी.सी आणि सी.आर.पी.सीचे जुने कायदे रद्द करून नवीन कायदे तयार केले आहेत. यामुळे अनेक कलमांमध्ये बदल होणार आहे. यामुळे पोलिसांना गुन्ह्यातील कायद्याच्या नोंदी बदलाव्या लागणार आहे. तोंडी असलेले कलम विसरून नवे कलम पाठ करावे लागणार आहे.
केंद्र सरकारने आय.पी.सी व सीआर.पी.सीचे जुने कायदे रद्द केले. त्याऐवजी नवीन कायदे तयार केले असून संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यांना मंजुरीही मिळाली. त्यामुळे आता लवकरच या नवीन कायद्याच्या कलमांन्वये पोलिसांसह संबंधित प्राधिकारणाला कार्यवाही करावी लागणार आहे.
जुन्या कायद्यातील अनेक कलमात सुद्धा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना या नवीन कलमांच्या आधारे गुन्हा नोंद करावा लागेल. त्यामुळे पोलिसांसह वकिलांनाही नव्या कायद्याचा अभ्यास करावा लागणार आहे. कायदे मागील तारखेपासून (रेट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट) लागू झाल्यास काही प्रकरणावर परिमाण होण्याची शक्यता आहे.
जाहिरात


