
संगमेश्वर प्रतिनिधी – देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच शिस्त आणि शांततेच्या आल्हाददायी वातावरणात संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक वर्गाने विजेतेपद प्राप्त करण्यासाठी जीवाची बाजी लावली. सांघिक व वैयक्तिक उत्तम कामगिरीच्या आधारावर १२वी कला वर्गाला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, कनिष्ठ विभाग जिमखाना प्रमुख प्रा. सानिका भालेकर यांच्या हस्ते बहाल करण्यात आला. सर्वसाधारण विजेतेपदाच्या चषकाचा स्वीकार संघ व्यवस्थापिका प्रा. सुवर्णा साळवी, विद्यार्थी स्वराज्य मंडळ क्रीडा प्रतिनिधी श्रीदीप करंडे आणि संघातील खेळाडूंनी केला. याप्रसंगी मान्यवरांनी आयुष आगरे आणि विक्रम घाग यांची महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सन्मानित करून शुभेच्छा देण्यात दिल्या.
वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेते उपविजेते खालील प्रमाणे:
सांघिक खेळ
खो-खो- मुले: विजेते- १२वी
कला, उपविजेते- ११वी कला. मुली: विजेत्या- ११वी कला, उपविजेत्या-११वी वाणिज्य.
कबड्डी- मुले: विजेते- १२वी कला, उपविजेते- १२वी वाणिज्य.
मुली: विजेत्या- १२वी कला, उपविजेत्या- ११वी संयुक्त.
हॉलीबॉल- मुले: विजेते- १२वी कला, उपविजेते- ११वी वाणिज्य-ब.
क्रिकेट- मुले: विजेते- १२वी वाणिज्य, उपविजेते-१२वी कला. मुली: विजेत्या-१२वी संयुक्त, उपविजेत्या- ११वी संयुक्त.
रस्सीखेच- मुले: विजेते- १२ वी वाणिज्य-ब, उपविजेते- १२वी कला. मुली: विजेत्या- १२वी वाणिज्य, उपविजेत्या- ११वी संयुक्त.
*वैयक्तिक खेळ*
*बुद्धिबळ-* विजेता-चिराग पवार(१२वी कला), उपविजेता- वेद लिंगायत(११वी वाणिज्य).
*कॅरम एकेरी-* मुले: विजेता- आयुष कदम(१२वी वाणिज्य), उपविजेता- फैम हकीम(११वी कला).
मुली: विजेती- सृष्टी गोरूले, उपविजेती-तेजस्वी घडशी(दोघी१२वी वाणिज्य-ब).
विद्यार्थ्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे संपन्न झालेल्या या स्पर्धेत विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये खो-खो प्रकारात ऋषिकेश सुवारे, आर्यन पावसकर, दिव्या व दिपाली सनगले, कबड्डीमध्ये श्रीदीप करंडे, वरद गुरव, सानिका धुलप, रिचा सावंत, हॉलीबॉलमध्ये सोहेल हरचीरकर, वेद लिंगायत, तर क्रिकेटमध्ये आयुष आगरे, विक्रम घाग, गोरक्ष जागुष्टे, मुक्ता गवंडी, केतकी कुलकर्णी आणि तन्वी कडू यांनी उत्तम खेळाद्वारे आपल्या वर्गाला यश प्राप्त करून दिले. वार्षिक क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. सुवर्णा साळवी, प्रा. स्वप्नाली झेपले, क्रीडा शिक्षक प्रा. सागर पवार, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. अभिनय पातेरे, प्रा.सुनील वैद्य आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेतली.
*फोटो-* सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक उपाध्यक्ष श्री. भोसले, प्राचार्य डॉ. तेंडोलकर आदी मान्यवरांकडू स्वीकारताना प्रा. सौ. साळवी, कु. करंडे, विद्यार्थी खेळाडू आणि उपस्थित शिक्षक.
*छाया-* प्रा. धनंजय दळवी.