मनसे लोकसभेच्या २२ जागा लढवण्याच्या तयारीत ? संभाव्य उमेदवारांची नावंही चर्चेत

Spread the love

ठाणे : निलेश घाग आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या अनुषगांने बैठका आणि इतर हालचाली मनसेने सुरू केल्या आहेत. मनसे लोकसभा निवडणुकीत पुर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचं दिसून येत आहे. मनसेची सोमवारी लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या २२ जागांचा आढावा घेण्यात आला आहे. मनसे मुंबईत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर काही जागांवरील संभाव्य उमेदावारांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, मनसे मुंबईतील सर्व सहा जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. तर ठाणे, कोकण येथे प्रत्येकी तीन जागांवर उमेदवार देऊ शकते. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात देखील उमेदवार देण्याच्या तयारीत मनसे आहे.

एकूण २२ जागा कोणत्या?


• मुंबई – ६
• ठाणे- ३
• कोकण -३
• पुणे – ४
• नाशिक – २
• कोल्हापूर – १
• सोलापूर – १
• अमरावती – १
• चंद्रपूर – १

या मतदार संघावर चर्चा झाल्याची माहिती आहे. याशिवाय बैठकीत नेत्यांची कानउघडणी करत जोमाने तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांचं नाव चर्चेत आहे. मुंबईतीच्या सर्व जागी मनसेकडून उमेदवार दिले जाऊ शकतात. कल्याणमधून विद्यमान आमदार राजू पाटील यांचं नाव चर्चेत आहे. बारामती किंवा पुण्यातून वसंत मोरे तर सोलापूर मधून दिलीप धोत्रे यांच्या नावाची चर्चा आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page