
रत्नागिरी: ‘माता न तू वैरिणी’ या म्हणीची प्रचिती देणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना आज, बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी कारवांचीवाडी पारस नगर येथे घडली आहे. मातेने आपल्या केवळ एक वर्षाच्या निष्पाप बाळाला क्रूरपणे ठार केले. हुरेन असिफ नाईक (वय १ वर्ष, रा. अलोरे, चिपळूण) असे मृत बाळाचे नाव आहे. शाहीन आसिफ नाईक (३५, चिपळूण अलोरे) असे आईचे नाव आहे. शाहीन हिने बाळाच्या तोंडात कापूस कोंबून त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
मूळ चिपळूण येथील रहिवासी असलेली ही महिला रत्नागिरीतील पारस नगर येथे वास्तव्यास होती. आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याला संपवल्याच्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृत बालकाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दरम्यान या महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे समजते. मात्र, हत्येमागील नेमके कारण काय आहे आणि महिला मानसिक रुग्ण आहे किंवा कसे, याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली असून या घटनेने रत्नागिरी शहर हादरले आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

