
जनशक्तीचा दबाव न्यूज | हातखंबा | ऑक्टोबर ०८, २०२३.
शनिवार दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०७:०० वा. निवळी येथील ‘हॉटेल अथर्व’मध्ये हातखंबा पं.स. गणाची भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक विधानसभा निवडणूक प्रमुख, माजी आमदार श्री. बाळासाहेब माने, तालुकाध्यक्ष श्री. संयोग (दादा) दळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. दि. १९ ऑक्टोबर रोजीचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा दौरा, बूथ कमिटी सक्षमीकरण, नवीन मतदार नोंदणी, सरल ऍप , संपर्क ते समर्थन आदी विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
मा. बाळासाहेब माने यांनी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पिंट्याशेठ निवळकर यांनी निवळी गावाच्या विकासाबाबत निवेदन केले तर युवा नेतृत्व निरंजन जठार व तालुका चिटणीस महेश खानविलकर यांनी हातखंबा गावातील विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली. बाळासाहेब माने यांनीही “शासनाच्या माधमातून विकास निधी उपलब्ध करून देऊ” असे आश्वासन दिले.
या बैठकीला विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. बाळासाहेब माने, तालुकाध्यक्ष दादा दळी, तालुका उपाध्यक्ष विजय गावडे, तालुका चिटणीस महेश खानविलकर, अनुसूचित जाती/जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष पिंट्याशेठ निवळकर, ग्रामपंचायत सदस्य हातखंबा निरंजन जठार, विवेक मुळे, संजय जोशी, विष्णू पेजे, अथर्व केळकर, संजय केळकर, पाल्ये, कोकजे गुरुजी आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.