
जमीन मालक संजय गांधींनी आमदार किरण सामंत यांचा मान ठेवून दिली जागा…
कोंडगाव ग्रामपंचायत येथे परिसरातील शिवप्रेमींच्या सभेचे आयोजन…
*साखरपा-* रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव तिठा येथे असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा महामार्गलगत असल्याने व रस्ता रुंदीकरणात हलवावा लागत असल्याने व तो उचलून इतर ठिकाणी कुठे बसवावा याबाबत आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कोंडगाव ग्रामपंचायत येथे परिसरातील शिवप्रेमींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आमदार किरण सामंत यांनी योग्य मार्गदर्शन करून जमीन मालक संजय गांधी यांच्याशी चर्चा करून योग्य तोडगा काढल्याने परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी नागपूर रस्त्याच्या रुंदीकरणात कोंडगाव तिठा तेथे असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बाजूला उचलून नवीन जागेत स्थापना करण्यासाठी रविवारी कोंडगाव ग्रामपंचायत कार्यालयात परिसरातील शिवप्रेमींची सभा घेण्यात आली या सभेत गेली कित्येक वर्ष कोंडगाव तिठा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रस्ता रुंदीकरणामुळे हलवावा लागत असल्याने तसेच तो पुतळा आज संकेत हॉटेलचे मालक संजय गांधी यांच्या खाजगी जागेत असून तो पुतळा उचलून पुन्हा नवीन जागेत बसवण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. मात्र नवीन जागेसाठी सभेमध्ये बरीच चर्चा झाली. ही चर्चा चालू असताना जमिनीचे मालक संजय गांधी हे या सभेत आले आणि आमदार भैया सामंत यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही तुमच्या इथे पुतळा बसवण्यासाठी जागा द्यावी. यावर बरीच साधकबाधक चर्चा झाली.
काहींच्या मते तो पुतळा नवीन स्टॅन्ड या जागेत बसवावा तर काहींच्या मते इतर ठिकाणी हलवावा अशी मतांतरे झाली परंतु आमदार भैया सामंत यांनी संजय गांधी यांना तुम्ही आपल्या जागेत शिव पुतळा बसवण्यासाठी जागा द्यावी अशी विनंती केली त्यावेळी संजय गांधी यांनी आमदार साहेब आपल्या शब्दाखातर आपला मान ठेवून मी चार फुटाची जागा देतो असे म्हटले. तसेच जागा मी दिली म्हणून त्या पुतळ्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर न टाकता शासनाने ही जबाबदारी घ्यावी असेही म्हटले कारण राज्यात कुठे दंगा किंवा विटंबना झाल्यास या पुतळ्याबाबत शासकीय यंत्रणेकडून मला वैयक्तिक पत्र व्यवहार केला जातो तसे न होता याची पूर्ण जबाबदारी शासकीय यंत्रणेने घ्यावी अशी विनंती केली. तसेच आपल्या विनंतीचा विचार केला जाईल, असा शब्द आमदार भैया सामंत यांनी यावेळी शासकीय यंत्रणेसमोर दिला.
आमदार भैया सामंत यांच्या मध्यस्थीमुळेच हा तोडगा निघाल्याने परिसरातून आमदार भैया सामंत यांचे आभार मानण्यात आले. यावेळी आ. भैय्या सामंत यांनी संजय गांधी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, पोलीस खाते अशा सर्व विभागाचे अधिकारी, रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम करणारे रवी इन्फ्राचे अधिकारी हजर होते. या सभेला कोंडगाव सरपंच श्रद्धा शेटये, विलास चाळके, बापू शेटये, राजेश पत्त्याणे, संजय सुर्वे, बापू शिंदे, जया माने, विलास बेर्डे, राजेश कामेरकर, बापू लोटणकर, प्रसाद अपंडकर, ओंकार कोलते, अमित केतकर, किरण सप्रे, शिरूशेठ कबनूरकर आदिंसह परिसरातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*