
आमदार गीता जैन यांनी महापालिकेच्या अभियंत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यामुळे गीता जैन या संबंधित अभियंत्यांवर संतापल्या. त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत असताना संतापात मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मिरारोड : महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या वतीने आज काशिमिरा पोलीस ठाणे येथे आमदार गीता जैन यांनी केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यावरील हल्ल्या संदर्भात निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे कार्याध्यक्ष धर्मेंद्र घाग, उपाध्यक्ष रविंद्र शिंदे, सरचिटणीस रविंद्र कुवेसकर, मीरा रोड विभागातील स्थानिक श्री चंद्रकांत सावंत, शिल्पाताई म्हात्रे शैलेश म्हात्रे हे उपस्थित होते.
निवेदन दिल्यानंतर संघटनेच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारे स्मरणिका महाराष्ट्र देश हा ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय कदम साहेब यांना देण्यात आली.

काश्मीरा पोलीस ठाणे निवेदन दिल्यानंतर मिरा रोड महानगरपालिका कार्यालयात जाऊन सरकारी अधिकारी शुभम पाटील यांची भेट घेतली तसेच संघटनेच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे. कायदेशीर कारवाई करण्याकरता संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे याचे आश्वासन देण्यात आले आहे.
जाहिरात
