
खेड : खेडमध्ये सकाळपासून पावसाने उसंत घेतलेली नाही. सतत पडणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदी आता दुथडी भरुन वाहत आहे. या नदीने इशारा पातळी ओलांडली असून, मटण मार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे. खेड नगर परिषद प्रशासन आणि तालुका आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.